-: प्रेस-नोट :-
मध्यप्रदेष व महाराष्ट्राच्या सीमेवर सौंदर्याने नटलेल्या सातपूडा पर्वत रांगेमध्ये वसलेले श्री दिगंबर जैन सिध्दक्षेत्र मुक्तागिरी येथे रविवार दि. ०९ जून २०१९ ते पासून शुक्रवार दि. १४ जून २०१९ पर्यंत श्रीमज्जिनेन्द्र पंचकल्याणक महोत्सव व विश्वशांती महायज्ञ सपन्न होत आहे.
दिगंबर जैन धर्म मान्यतेनुसार तिर्थंकर प्रतिमेचे ५ प्रकारचे कल्याणकद्वारे (गर्भकल्याणक, जन्मकल्याणक, तपकल्याणक, ज्ञानकल्याणक, मोक्षकल्याणक) आचार्यश्रींच्या मधुरवाणीद्वारे मंत्रोच्चार करुन त्याप्रतिमा प्रतिष्ठीत करुन पुजनीय होतात. असे पंचकल्याणक मुक्तागिरी सिध्दक्षेत्रवर ५१ वर्षा अगोदर १९६८ संपन्न झाले होते.
श्री दिगंबर जैन सिध्दक्षेत्र मुक्तागिरी येथे ५१ वर्षानंतर श्रीमज्जिनेन्द्र पंचकल्याणक महोत्सव व विश्वशांती महायज्ञ आयोजित करण्यात आलेले आहे. सिध्दक्षेत्र मुक्तागिरी येथे पहाडावर विविध ५२ मंदिरामध्ये दगडामध्ये कोरलेल्या प्राचिन प्रतिमा आहेत. त्या पुरातन प्रतिमा काळाच्या ओघात व निसर्गाच्या परिणामामुळे काही प्रमाणात खंडीत झाल्या होत्या. त्या सर्व प्रतिमांना पुन्हा कारवींग करुन नविन रुप देण्यात आले तसेच काही प्रतिमा मुक्तागिरी पहाडातील दगडांमध्येच कोरुन तयार करण्यात आल्या आहेत. यासर्व प्रतिमा पंचकल्याणकाद्वारे पुजनीय व प्रतिष्ठीत करण्याचा मांगलीक कार्यक्रम म्हणजे मज्जिनेन्द्र पंचकल्याणक महोत्सव आयोजित केलेला आहे.
या कार्यक्रमाला चर्याशिरोमणी आचार्य विशुध्दसागर महाराज व त्याचेसोबत २४ मुनींच्या संघाचे सानिध्य व आशिर्वाद लाभणार आहेत. हा पंचकल्याणक महोत्सव रविवार दि. ०९ जून २०१९ ते पासून शुक्रवार दि. १४ जून २०१९ पर्यंत साजरा होत आहे. याशिवाय १४ जून २०१९ रोजी विश्वशांती महायज्ञसाठी होमहवन करुन विश्वशांतीचा संदेश जगभर देण्यात येणार आहे. विविध धार्मिक कार्यक्रमाशिवाय आचार्य श्री १०८ विशुध्दसागर महाराजांचे रोज सकाळी ९ : ०० वाजता व दुपारी ३ : ३० वाजता वेगवेगळया विषयांवर प्रवचन होणार आहे.
या महोत्सवासाठी ३००० हजार चै. फुट मंचाचे भव्य उभारणी करण्यात आली असून ६५०० चै. फुटाचा मंडप टाकण्यात आला आहे, यामध्ये मंचावर दिल्ली येथील संगीतकार पारसजी अंबर यांचे संगीत राहणार आहे. तसेच ललितपूर निवासी चंद्रेषजी सोजना हे निवेदक राहणार आहे, व हा संपूर्ण महोत्सव चिचोली निवासी पंडीत संजयजी सरस यांच्या मार्गदर्शनात होणार आहे.
यामध्ये अमेरीका, मुबंई, नासिक, नागपूर, भोपाळ, अमरावती, अकोला, अंजनगाव सुर्जी, कारंजा लाड यासारख्या शहरातून इंद्र इंद्रायणी बनण्यासाठी भाविक येणार आहेत. त्याशिवाय संपुर्ण भारतातून मोठया संख्येने भक्त/भाविक उपस्थित राहून धर्मलाभ घेणार आहेत. सर्व भाविकांचे राहण्याची,जेवणाची व परतवाडा येथून जाण्या-येण्याची यथोचित व्यवस्था संस्थानद्वारे करण्यात आली आहे. राज्य महामंडळाने अमरावती व परतवाडा येथून मुक्तागिरीसाठी यात्रा स्पेशल गाडयांची विशेष व्यवस्था होण्याची शक्यता आहे.
या पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवसाठी विविध समित्या तयार करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय अमरावती, परतवाडा, अंजनगाव सुर्जी, कारंजा लाड व बैतूल येथील संपुर्ण जैन समाजाचे सहकार्याने महोत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे.
या महोत्सवासाठी सर्व भाविकांनी तसेच प्रसार माध्यमांनी उपस्थित राहून धर्मलाभ घ्यावा व कार्यक्रमांची शोभा वाढवावी अशी विनंती पंचकल्याणक महामहोत्सव समिती तसेच श्री दिगंबर जैन सिध्दक्षेत्र मुक्तागिरी तर्फे करण्यात येत आहे.
श्री. अतुल विजय कळमकर (मॅनेजिंग ट्रस्टी)
श्री दिगंबर जैन सिध्दक्षेत्र मुक्तागिरी.
समन्वयक :- प्रसाद संगई, अंजनगाव सुर्जी. ट्रस्टी मुक्तागिरी मो. ९४२३१२५०१२.
उपाध्यक्ष :- विलास उदापूरकर, परातवाडा. मो. ९४२३१२६६९४. सुधाकर सिंगारे, आमला, जि. बैतूल मो. ९९२६७६९६७०.
कोषाध्यक्ष :- जयंत जोहरापूरकर, अमरावती. मो. ९४०३०५४३००. सचिव :- कमल पापडीवाल, परातवाडा. मो. ९४२२१९०००६.
सहसचिव :- योगेश विटाळकर, अमरावती. मो. ९३७२४१४३४०.